बातमी

दूध पिऊन नववर्षाचे स्वागत

मनोज भाऊ दांडगे यांच्या संकल्पनेतून गावकरी यांनी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम

जामठी:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल माननीय मनोज भाऊ दांडगे यांच्या संकल्पनेतून जामठी येथील गावकरी यांनी नवीन वर्षाचे स्वागत दूध पिऊन केले.मनोज भाऊ दांडगे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दूध घोटून दूध पिण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मनोज भाऊ दांडगे यांच्या हस्ते युवकांना दूध वाटप करण्यात आले. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप व २०२४ येणाऱ्या वर्षाचे स्वागत करताना दारू नाही,तर दूध प्या आणि सशक्त होऊन भारत घडवा. नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे, तर शुध्दीत करा या उदात्त हेतूने मनोज भाऊ दांडगे व गावकरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवकांना एक समाज उपयोगी संदेश दिला.यावेळी गावकरी उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button