*उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक प्राध्यापक सदानंद माळी यांचा _शिव विचार संकल्प संपर्क अभियाना_ चा प्रारंभ*
बुलढाणा विधानसभेच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलढाणा जिल्हा संघटक प्राध्यापक सदानंद माळी यांनी शिव विचार संकल्प संपर्क अभियानाची सुरुवात आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर केली सुरवात
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या जनहिताच्या निर्णयांचे, शेतकऱ्यांच्या केलेल्या सरसकट कर्जमाफींच्या बाबतीत, कुटुंबप्रमुख म्हणून राज्याचे स्वीकारलेले पालकत्व व गंभीर महामारीच्या काळात जनते सोबतची कुटुंबप्रमुखाची भूमिका व अन्य विकास कामांची माहिती या संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्राध्यापक माळी यांनी देण्यास सुरुवात केली आहे.
देशपातळीवर अत्यंत महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री म्हणून भूमिका पार पडत असताना शिंदे फडणीस पवार सारख्या नेत्यांनी दाखवलेला अविश्वास व मुख्यमंत्र्यांना सोडावे लागलेले पद हे महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी धक्कादायक घटना होत.
महाराष्ट्राला लावलेला गद्दारीचा कलंक पुसून पुन्हा उद्धव साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान करण्याचा संकल्प या अभियानाच्या भेटीदरम्यान त्यांनी जनतेमध्ये व्यक्त केला.
आपल्या शिवसंकल्प संपर्क अभिनयाची सुरुवात मोताळा तालुक्यातून केली. रिधोरा, वाडी, गुगळी, लिहा व आव्हा या गावातील ग्रामस्थांच्या व पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रा. डॉ गणेश हुडेकर, रघुनाथ जाधव, रिधोरा सरपंच रवी भाऊ चव्हाण उपसरपंच आधार सिंग मोरे, दीपक कानडजे, स्वप्निल प्रधान, संजय बराटे, रमेश नारखेडे, प्रतापसिंग सोळुंके, सरपंच रमेश वाघ,संजीव पाटील, शिवाजी खडके, गजानन इंगळे विजय तायडे गजानन सपकाळ शंकर सपकाळ डी एस सपकाळ,शुभम घोंगटे, चंदाताई सोनवणे व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते