बातमी

*मानस फाउंडेशनच्या कार्यावर प्रशासनाची मोहर…* *प्रा. डी एस लहाने यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव!*

*मानस फाउंडेशनच्या कार्यावर प्रशासनाची मोहर…*

*प्रा. डी एस लहाने यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव!*

*बुलढाणा*
*प्रा. डी एस लहाने यांनी बुलढाणा येथे विधवा महिलांसाठी ऐतिहासिक कार्य सुरू केले आहे. विधवा विवाह सोहळे,पालकांचे समुपदेशन, विधवा परिषदा घेऊन त्यांनी सामाजिक बदलाचे पाऊल टाकले. याची दखल घेत आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी लहाने यांचा सन्मान केला. आज मानस फाउंडेशनच्या कार्यावर खऱ्या अर्थाने प्रशासनाची देखील गौरवाची मोहर उमटली आहे.*

*सामाजिक बदल हा सहजासहजी होत नाही. त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. चांगली बाब असली तरीही ती लोकांच्या मनी मानसी, गळी उतरवावी लागते. हेच काम प्रा. डी एस लहाने आणि माणस फाउंडेशन करीत आहे. विधवा महिला यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी त्यांनी विधवा महिला परिषद,विधवा विवाह सोहळे व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले हे कार्य ऐतिहासिक आहे. याची जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दखल घेत आज त्यांचा जिल्हाधिकारी* *कार्यालयात मुख्य शासकीय समारंभात सन्मान केला. सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केले. यानंतर प्रा. डी एस लहाने यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड,जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम,जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, माणस फाउंडेशनचे उपाध्यक्ष पत्रकार गणेश निकम, प्राचार्य शहीनाताई पठाण ,वृषाली दत्तात्रय लहाने,प्रज्ञाताई लांजेवार , अमोल रिंढे, प्रतिभा भुतेकर ,मनीषा वारे ,अनिता कापरे ,प्राध्यापक ज्योती पाटील, गौरव देशमुख, एडवोकेट संदीप जाधव, कडूबा सोनवणे, किरण* *पाटील,दिनकर पांडे ,गजानन मुळे, यांच्या सह प्रशासनाच्या विविध कक्षांचे अधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधवांची मोठी उपस्थिती लाभली होती.*
*प्रशासनाने सन्मानित केल्याबद्दल मनस फाउंडेशनने आनंद व्यक्त केला आहे.*

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button