बातमी

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवार दि. २१ सप्टेंबर 2024 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहतील.

सकाळी 11.00 वा. चिखली येथून ते प्रवासाला सुरुवात करणार आहेत. चिखली येथील हॉटेल मीरा सेलीब्रेशन येथे ते चिखली विधानसभा भाजपा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील. दुपारी 03.00 वा. मलकापूर येथील भाजपा कार्यालय, गणपती नगर येथे मलकापूर विधानसभा भाजपा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील. तर सायंकाळी 07.00 वा. खामगाव येथील तुळजाई हॉटेल, पंचायत समिती समोर येथे खामगाव  विधानसभा भाजपा कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button