पळसखेड नागो येथील जवानाला वीरमरण गावात पसरली शोककळा

पळसखेड नागो येथील जवानाला वीरमरण
गावात पसरली शोककळा
देश रक्षणाचे कर्तव्य बजावत असलेल्या बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील दीपक बनसोडे यांनी वीरमरण पत्करले. ही घटना 22 सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या लंगेट, कुपवाडा येथे घडली असून 168 मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये जवानाला उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरने त्यांना मृत्यू घोषित केले.
बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील भूमिपुत्र दीपक बनसोडे गत 5 वर्षापासून सैन्य दलात राष्ट्रीय रायफलच्या युनिट 12 महार रेजिमेंट मध्ये कार्यरत होता. त्यांना एका अपघातात वीरमरण आल्याची माहिती समोर येत असून अद्याप पर्यंत आमच्या पर्यंत अधिकृत माहिती आली नाही, अशी माहिती बुलडाणा जिल्हा सैनिक कार्यालयाने आज 24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता दिली आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबई येथे विमानाने त्यांचा पार्थिव आणण्यात येईल तसेच ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या राहत्या घरी पळसखेड नागो येथे मृतदेह रात्री पोहोचल्यानंतर आज 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अंतिम संस्काराची तय्यारीला प्रशासन कामाला लागले असून पालसखेड फाट्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती पालसखेडचे माजी सरपंच भुपेश जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.



