निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटात
जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

निबंध व चित्रकला स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा थाटात
जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ आयोजित ‘मिशन परिवर्तन’ स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग
बुलढाणा, ८ नोव्हेंबर ः बुलढाणा जिल्हा पोलिस दल आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ अंतर्गत वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत नशामुक्ती विषयाला घेऊन ऑगस्ट सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या निबंध चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह आज ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रभा हॉल, पोलिस मुख्यालय बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. निबंध व चित्रकला स्पर्धेचे परिक्षण करणार्या परिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सायबर सुरक्षेबाबत पथनाटय सादर करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी संबोधित करतांना सांगितले की, बुलढाणा जिल्ह्यात मिशन परिवर्तन अंतर्गत विविध उपक्रम राबविल्या जात आहे. त्यामध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा सुध्दा जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. याला जिल्हा भरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल त्यांनी आभार मानले व जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आयुष्यात चार ‘आर’ चा अवलंब केला पाहिजे त्यामध्ये रिड, रिव्हाइस, रिप्रोड्यूस, रिझल्ट याचा समावेश आहे. एसपी श्री.तांबे यांनी उपस्थितांना नशामुक्तीचे शपथ दिली.
अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नशा पासून दूर राहिले पाहिजे. आपणास जर कुणी बळजबरीने नशा करण्यास भाग पाडत असेल तर त्याला बळी पडू नाही. कुठलीही नशा आरोग्यास धोकादायक आहे. नशा नाही तर योग्य दिशा आयुष्यला देता आली पाहिजे जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ यांनी संयुक्तीकरित्या राबविलेल्या चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात नशा करण्याचे दुष्परिणाम याबद्दल जनजागृती झाली.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेला जिल्हा भरातून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. निबंध स्पर्धेने तर नविन उच्चांकच घाटला आहे. तब्बल आठ ते नऊ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेऊन विक्रम रचला आहे. जिल्हा पोलिस दल आणि जिल्हा पत्रकार संघ यापुढे सुध्दा मिळून चांगले उपक्रम जिल्हाभरात राबवू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर, बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड, पोलिस कल्याण शाखेचे श्री.पावरा, पोलिस उपनिरीक्षक विजय हुडेकर, जिल्हा पत्रकार हल्ला विरोधीचे समन्वयक राजेश डिडोळकर, जिल्हा पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर अहेर, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस कासिम शेख, कार्याध्यक्ष वसिम शेख, सचिव शिवाजीराव मामलकर, रविंद्र गणेशे, कोषाध्यक्ष ब्रम्हानंद जाधव, प्रेमकुमार राठोड, सुधाकर मानवतकर, पवन सोनारे, डॉ.भागवत वसे, राम हिंगे, अजय काकडे, मॉं जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे, ऍड.रमेश भागिले, भूषण पंजाबी, पोलिस दलातील ज्योती राठोड, रेखा बकाल यांच्यासह पोलिस कर्मचारी, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासह इतरांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे योग्य आणि सुत्रबध्द सुत्रसंचलन डॉ.गायत्री सावजी यांनी केले तर कार्यक्रामाचे आभार प्रदर्शन जिल्हा पत्रकार संघाच्या महिला सेलच्या जिल्हाध्यक्ष मृणाल सावळे यांनी केले



