बुलढाणा जिल्ह्यात लवकरच दाखल होणार 150 ईव्ही एसटी बस, पहिल्या टप्प्यात मिळणार 12 बस…
युद्ध पातळीवर होत आहे चार्जिंग स्टेशनचे बांधकाम..

बुलढाणा जिल्ह्यात लवकरच दाखल होणार 150 ईव्ही एसटी बस, पहिल्या टप्प्यात मिळणार 12 बस…
युद्ध पातळीवर होत आहे चार्जिंग स्टेशनचे बांधकाम..
पर्यावरणाला आळा घालण्यासाठी राज्यभरातच ईव्ही एसटी बस दाखल झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील सात आगारांसाठी विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार 150 ईव्ही एसटी बसची मागणी करण्यात आली होती.. त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 बस दाखल होणार आहेत, तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्याटप्प्याने येणार आहेत..
यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनची बुलढाणा आगार परिसरात उभारणी करण्यात आली आहे, एकूण चार्जिंग साठी 17 मशीन असणार आहेत, त्यापैकी सध्या 9 चार्जिंग मशीन पूर्णपणे इन्स्टॉल करण्यात आल्या आहेत, उर्वरित मशीन लवकरच कार्यान्वित होणार आहेत.. एका बसला शंभर टक्के चार्जिंग करण्यासाठी दीड तासाचा अवधी लागणार आहे, त्यासाठी दिवसभर चार्जिंगची व्यवस्था असणार आहे.. एकदा चार्ज केल्यानंतर 250 किलोमीटर ही बस धावणार आहे.. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासा संदर्भात योग्य ती सर्व खबरदारी राखण्यात आली आहे.. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांनी कुठेही भीती न बाळगता ईव्ही बसमधून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केले आहे…



