बातमी
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील स्टेट बँक चौक व तहसील चौक ला अटलजींचे नाव देण्याची मागणी….

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील स्टेट बँक चौक व तहसील चौक ला अटलजींचे नाव देण्याची मागणी….
बुलडाणा भारतरत्न तथा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे
अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले संपूर्ण आयुष्यत देशाच्या विकासासाठी मजबूत व आत्मनिर्भर विकसित भारतासाठी वेचले त्यांच्या या कार्याची येणाऱ्या पिढींना स्फूर्ती मिळावी यासाठी देशभक्ती देश प्रेम जागृत राहावे येणाऱ्या पिढीने आदर्श घ्यावा यासाठी तहसील चौक स्टेट बँक चौक व खुल्या उद्यानांना भारतरत्न तथा माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी उद्यान असे नाव देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे