*यशाची परंपरा कायम! ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के..*

*यशाची परंपरा कायम! ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के..*
*बारावीपाठोपाठ दहावीतही विद्यालयाची ‘सेंचुरी’; सोहम अशोक गायकवाड ९६.४०,गौरी योगेश पोतदार ९६.०० व वैष्णवी विनोद पिंपळे ९६. ०० टक्क्यांसह प्रथम..*
धाड: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, ८ मे २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला.या निकालात धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयाने आपली उतुंग यशाची परंपरा कायम राखत १०० टक्के निकालाची नोंद केली आहे.विशेष म्हणजे,नुकताच जाहीर झालेला या विद्यालयाचा बारावीचा निकालही १०० टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेने यशाचे सातत्य टिकवून ठेवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
या वर्षीच्या निकालात *सोहम अशोक गायकवाड याने ९६.४०% गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला. त्याच्यासोबतच गौरी योगेश पोतदार (९६%) आणि वैष्णवी विनोद पिंपळे (९६%) यांनीही प्रथम क्रमांकाच्या श्रेणीत स्थान मिळवले. द्वितीय क्रमांकावर रुद्र ज्ञानेश्वर कोथळकर, प्रगती संजय पंडित, कुणाल सुभाष गुजर आणि ऋषिकेश प्रशांत देवकर या चौघांनी ९५% गुण मिळवून बाजी मारली. तृतीय क्रमांकावर सिद्धी अमोल सोनुने (९४.२०%) ही राहिली, तर धनश्री पुरुषोत्तम पिंपळे, सचिन गणेश राजपूत, योगानंद समाधान सोनुने, सार्थक विष्णू सिनकर आणि प्रिया नरसिंग बिबने यांनी प्रत्येकी ९४% गुण प्राप्त करून तृतीय श्रेणीत स्थान मिळवले.*
विद्यालयाचा निकाल यंदा अत्यंत चढा राहिला असून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा टक्का आहे. विद्यालयातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे एकूण २७ विद्यार्थी आहेत, तर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण ७ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. तसेच ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण १० विद्यार्थ्यांनी मिळवले असून ८० टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई २ विद्यार्थ्यांनी केली आहे.
या गुणवंत यादीत प्रामुख्याने आदित्य भाऊसाहेब दाभाडे (९३.२०%), निखिल विजय वेलदोडे (९३%), आदित्य राजेंद्र घट्टे (९३%), नंदकिशोर सुनील वाघ (९२.४०%), ओम किशोर तायडे (९२%), सोहम रामधन नप्ते (९२%), गौरी अमोल धंदर (९२%), गायत्री अरविंद सर्जेराव (९२%), श्रीहरी विजय दळवी (९२%), चेतन गणेश तायडे (९२%), ऋषिकेश संदीप पायघन (९१.४०%), फैसल खान हमीद खान (९१%), सानिका संजय गोरे (९१%), तनवीर जुमान तडवी (९१%), आयान पठाण (९०%), गुंजन मुकुंद खरात (९०%), रोहन महादू वाघ (८९.४०%), रोहन गजानन लवंगे (८९.२०%), शंतनू विकास लोखंडे (८९%), ओम श्रीकृष्ण वाघ (८८.४०%), प्रतीक वैभव पोतदार (८८.२०%), ऋतुराज राजेश पिंगळे (८८.२०%), आर्यन धम्मपाल सुरडकर (८५.४०%), सौरव शंकर जाधव (८५.४०%), पियुष गणेश तायडे (८४.४०%), मुरारी प्रकाश सापधारे (८१%) आणि ऋतुजा सतीश चव्हाण (५३.४०%) या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मनोजभाऊ दांडगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी प्रतिभा आहे, त्यांच्या कष्टाला योग्य दिशा मिळाल्यानेच विद्यालयाने सलग १०० टक्के निकालाचा टप्पा गाठला आहे.” तसेच संस्थेचे विश्वस्त श्री संतोष भाऊ दांडगे व सचिव श्री उमेश भाऊ दांडगे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष डवले सर यांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक यशासाठी उपमुख्याध्यापक अमोल जाधव सर, प्रवीण चव्हाण सर, वर्गशिक्षक संजय कुन्नर सर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या ‘शंभर नंबरी’ यशामुळे संपूर्ण धाड परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



