उपवर्गीकरण बदर समिती रद्द करा रिपाई आठवले गटाने आमदार सुजूभाऊ गायकवाड यांचे मार्फत मुख्यमंत्र्याना दिले निवेदन

उपवर्गीकरण बदर समिती रद्द करा रिपाई आठवले गटाने आमदार सुजूभाऊ गायकवाड यांचे मार्फत मुख्यमंत्र्याना दिले निवेदन
बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली 2 जून 2026 रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे विकास मुर्ती लोकप्रिय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांना उपर्गीकरण व बदर समिती रद्द करावी मागणीचे चर्चाकरून निवेदन देण्यात आले की, आपण येत्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकर व बदर समिती रद्द करावी असी आमची मागणी उपस्थित करून माननिय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना अनुसूचित जाती अबकड उपवर्गीकरण व बदर समिती जी नेमली आहे. जी अनुसूचित जाती (एसी) प्रवर्गा मधे जो एकसंध सलोखा होता तो तसाच राहिला पाहिजे व तो गुण्यागोविंदाने हा प्रवर्ग राहावा यासाठी बदर समीती जी अनुसूचित जाती अबकड उपवर्गासाठी नेमली आहे. ती असविधानीक आहे ती जाती जातीत तेढ निर्माण करणारी आहे म्हणून ती रद्द करण्यासाठी आपण येत्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करावा व तो का रद्द करावा हे विधीमंडळाच्या निदर्शनास आणून द्यावा ही विनंती या निवेदनाद्वारे केली. लोकप्रिय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी रिपाई शिष्टमंडळास आश्वासन दिले की, मी हा तूमचा प्रश्न येत्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून तो रद्द कसा करता येईल याचा मी प्रयत्न करेल असे आश्वासन रिपाई शिष्टमंडळास दिले. यावेळी समाजभूषण ज्येष्ठनेते इंजि. प्रा. भैयासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, विदर्भनेते मुरलीधर गवई, विदर्भमहीलाउपाध्यक्षा आशाताई वानखेडे , महीलाजिल्हाध्यक्षा वंदनाताई वाघ, मराठानेते रामभाऊ शिंदे, जिल्हासंघटन संपर्क प्रमुख इंजि. शरद खरात, जिल्हाउपाध्यक्ष इंजि.राजेश सरकटे, युवाध्यक्ष प्रकाश पाटील, महासचिव निळकंठ सोनोने, इंजि.भास्करराव जाधव,सागवन ग्रामपंचायत सदस्य सुभाष मिसाळ,रोहन सोनारे,वैभव सिरसाठ,सुरज सोनारे, विजय साबळे, दलित मित्र विजय सपकाळ, भाऊसाहेब वानखडे सर्वश्री तालुक्याध्यक्ष केशव सरकटे, बाळासाहेब आहीरे, हिम्मतराव जाधव, समाधान सरदार, बाबुलाल इंगळे, राणा मोरे, राहुल आवसरमोल, भानुदास शेजूळ, पत्रकार विजय भालमोडे, रमेश पिंपळे, प्रदिप मुखदयाल, आकाशभैया साळवे,सुधीरदादा हिवाळे,पत्रकार शैलेश वाकोडे, दिलीप इंगळे, मनोज धमेरिया, विलास गव्हांदे, संतोष वानखडे इत्यादी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी हजर होते.



