मासरूळ येथे कार्यकर्ता मेळावा व लोकार्पण सोहळा पालकमंत्री मकरंद पाटील यांची उपस्थितीत थाटात संपन्न…
राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी मनोज दांडगे यांच्यासारखा कार्यकर्ता हवा.. पालकमंत्री मकरंद पाटील

राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी मनोज दांडगे यांच्यासारखा कार्यकर्ता हवा.. पालकमंत्री मकरंद पाटील

मासरूळ येथे कार्यकर्ता मेळावा व लोकार्पण सोहळा पालकमंत्री मकरंद पाटील यांची उपस्थितीत थाटात संपन्न…
मनोज दांडगे यांच्या कामाचे पालकमंत्रीनि कौतुक तर जिल्हा बँकेत तुम्ही नाचत नाचत जाणार असल्याची दिली ग्वाही..
मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष तथा चिखली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मनोज ज्ञानदेवराव दांडगे यांच्या पुढाकारातून भव्य कार्यकर्ता मेळावा व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा शनिवार,15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता मासरूळ येथे मोठ्या थाटामाटा पार पडला
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला , यावेळी मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमधील विकासकामे व भव्य असा कार्यकर्ता मेळावा पार पडला या कार्यक्रमास सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग तथा जिल्हाध्यक्ष नाझेरजी काझी, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला जेसीबीच्या साह्याने मान्यवरांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित कार्यकर्ता मेळाव्याला मान्यवरांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी मनोज दांडगे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांना भविष्यात कुठल्याही निधीची कमी पडू देणार नसल्याची ग्वाही देत आपण सदैव त्यांच्या पाठीशी असून जिल्हा बँकेत देखील त्यांचा विजय होईल आणि नक्कीच ते जिल्हा बँकेत अंगावर गुलाल घेऊन नाचत नाचत जातील असे पालकमंत्री आबा पाटील यांनी सांगितले तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस च्या या कार्यकर्त्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहाल व येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सर्कल मधून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येईल असे भरभरून मतदान तुम्ही करावे असे आवाहन देखील उपस्थित जनतेला केले आणि या कार्यक्रमात मासरूळ परिसरातील कार्यकर्ते व वय वृद्ध नागरिक युवक तर मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग बघायला मिळाला.



