शिवसाईच्या डी. एस. लहाने यांना शिवसेनेची उमेदवारी * उबाठाकडून अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी तिकीट फायनल…

शिवसाईच्या डी. एस. लहाने यांना शिवसेनेची उमेदवारी
* उबाठाकडून अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी तिकीट फायनल…
बुलढाणा
शिवसेना उबाठाकडून अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी प्रा.डी. एस. लहाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हे तिकीट फायनल झाल्याची माहिती शिवसेनेच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली.
अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणुक तीन ते चार महिन्यावर आली असून हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. बुलढाण्यातून उबाठाचे नेते डी. एस. लहाने यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आधीपासून ते तिकिटाच्या रेसमध्ये आघाडीवर होते. अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, आमदार ज. मो. अभ्यंकर, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.



