जिजाऊ ज्ञान मंदिरचा मो.आयान गाजवणार अमरावतीचा विचारमंच

जिजाऊ ज्ञान मंदिरचा मो.आयान गाजवणार अमरावतीचा विचारमंच
* आज विभागीय भाषण स्पर्धा; साहेब, दादा, ताईंनी दिल्या शुभेच्छा…
बुलढाणा
जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला रायपूर येथील जिजाऊ ज्ञान मंदिरचा मो. आयान आज होणारी विभागीय स्पर्धा गाजवणार आहे. यशवंत हो…गुणवंत हो अशा शुभेच्छा अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी आयानला दिल्या.
जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल, अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी ‘मो.आयान मो. जावेद’ याने ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र : 2047 – संधी व आव्हाने’ या विषयावरील जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा 31 ऑगस्ट 2026 रोजी शिवाजी हायस्कुल बुलडाणा येथे झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने भाषण स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणे हे कौतुकास्पद आणि उल्लेखनीय यश आहे. स्पर्धेत आपण कुठेच कमी नसल्याचे मो. आयानने दाखवून दिले आहे. संस्थाध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या नेतृत्वात जिजाऊ ज्ञान मंदिरची यशस्वी वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच नवोपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासावर संस्थाध्यक्षांचा भर राहिला आहे. त्यामुळेच कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थी चमक दाखवत आहेत. भाषण स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेला मो. आयान विभागीय स्पर्धेत यश मिळवेल, असा विश्वास संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला आहे.



