महाराष्ट्रातील रिपाइं मराठा आघाडीतील व बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा- मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष दानसुर रमेश आण्णा मुळे यांचे आवाहन

महाराष्ट्रातील रिपाइं मराठा आघाडीतील व बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा- मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष दानसुर रमेश आण्णा मुळे यांचे आवाहन
बुलढाणा,
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर स्वाक्षरीने तयार झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चा ६९ वा वर्धापन दिन सोहळा ३ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून रिपाइं मराठा आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने महाराष्ट्र मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दानसूर लोकनेते रमेश आण्णा मुळे यांनी एकाप्रसिध्दी पत्रकाव्दारे देण्यात आली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार लोकनेते दलितांचे ह्रदयसम्राट डॉ. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनोवणे, राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री अविनाश महातेकर, राज्य संघटक सुधाकर तायडे, विदर्भाध्यक्ष मोहन भोयर आणि विदर्भउपाध्यक्ष भाऊसाहेब वानखडे, विदर्भ सचिव विजय सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्याला बुलढाणा जिल्ह्यातील पक्षाचे तसेच महाराष्ट्रातील मराठा आघाडीतील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, उत्तर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप खरात, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिलीप काकडे, जिल्हा संघटक संपर्कप्रमुख इंजिनियर शरद खरात, विदर्भ महिला अध्यक्षा आशा वानखडे, विदर्भ कार्याध्यक्ष मुरलीधर गवई, विदर्भ उपाध्यक्ष संजय वाकोडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण, जिल्हा महिला अध्यक्षा वंदना वाघ आणि जिल्हा युवकाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“३ ऑक्टोबर हा रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन असून, हा दिवस आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा आहे. पक्षाचा विचार आणि ध्येयधोरणे घराघरात पोहोचविण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे. केंद्रीय, राज्य, जिल्हा, विभागीय, तालुका आणि शाखास्तरावरील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आंबेडकरी विचारांच्या जनतेने मोठ्या संख्येने वाशी येथे उपस्थित राहावे,” असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव यांनी केले.
या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता असून, राज्यभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शाखास्तरीय कार्यकर्ते आणि सभासदांनी आपल्या स्तरावर कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी तसेच वेळेवर वाशी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख बाबासाहेब जाधव, उत्तर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप खरात यांनी केले आहे.



