बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राचा अवमान; शायना एन.सी. यांच्यावर कठोर कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीची मागणी*
जाहीर माफी मागण्याचीही मागणी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

*बाळासाहेब ठाकरेंच्या छायाचित्राचा अवमान; शायना एन.सी. यांच्यावर कठोर कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीची मागणी*
*जाहीर माफी मागण्याचीही मागणी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा*
बुलढाणा : सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील एका पानावरून सुरू झालेल्या राजकीय वादात पत्रकार परिषदेदरम्यान शायना एन.सी. यांच्याकडून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्याचा आरोप करण्यात येत असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या कृतीचा बुलढाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे हे केवळ महाराष्ट्रातील एक प्रभावी राजकीय नेते नव्हते, तर लाखो शिवसैनिकांच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे प्रतीक होते. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या छायाचित्राचा अवमान करणे ही बाब अत्यंत निषेधार्ह असून, कोणत्याही राजकीय वादाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका महिला आघाडीने मांडली आहे.
या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन शायना एन.सी. यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अवमानाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे, जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे.
सदर प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख विजय इतवारे, कामगारसेना जिल्हाप्रमुख शेख रफीक शेख करीम, महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिता जाधव, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, शहर संपर्कप्रमुख सुनिल भाग्यवंत, शहर प्रमुख विजय राऊत, श्रीकांत जाधव, निलेश हरकल, अनिल राणा, राहुल जाधव, अमोल बेंडे, सोपान लाहे, गजानन गवई, पुजा शिंगणे, सविता राऊत, रोशनी गरड, भारती भारंबे, वैशाली मिसाळ, शारदा दाभाडे, स्वाती लोंढेकर, सुनिता दराखे, सुरेखा कदम, बेबी परिहार, निता चव्हाण, यशोदा देशमुख, रुपाली चव्हाण, भारती डागोर, सरला मोरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.



