शिवसाईच्या मिहिर अपारणे मिळवले शालेय राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक

शिवसाईच्या मिहिर अपारणे मिळवले शालेय राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक
गुजरात घटक राज्यात सुरू असलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा आर्चरी संगदेखील दाखल झाला होता. या संघात बुलढाणा या ठिकाणी शिवसाई युनिव्हर्सल जुनिअर कॉलेज चा मिहीर अपार याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील केले. त्याने अंडर 19 कंपाउंड राउंड मध्ये खेळत असताना सुवर्णपदक प्राप्त केले आहे. व त्याने महाराष्ट्र संघाला देखील सुवर्णपदक प्राप्त करून दिली आहे. मिहीर हा बुलढाणा या ठिकाणी असलेली शिवबा धनुर्विद्या अकादमी मध्ये प्रशिक्षण घेतो. तो घेत असलेले प्रशिक्षण सतत प्रशिक्षण त्याचेच फळ त्याला आज मिळाले आहे. असे प्रतिपादन बोलताना शिवसाई युनिव्हर्सल जुनिअर कॉलेजचे संचालक डी एस लहाने सर यांनी व्यक्त केले आहे. त्याच्या या यशाबद्दल शिवसाई युनिव्हर्सल जुनियर कॉलेज व बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या यशाबद्दल शिवसाई चे प्राचार्य प्रमोद मोहरकर सर यांनी देखील त्याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक चंद्रकांत इलग सर ,उबाळे सर व आपल्या आई-वडिलांना दिले आहे. तो सतत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या राज्यासाठी व देशासाठी उत्कृष्ट खेळी करत आहे. व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक तो संपूर्ण देशभरात वाढवत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून त्याचे कौतुक होत आहे.



