बातमी

भाऊबीजेला बहीण भावांच्या भेटीला! * मविआच्या जयश्रीताई शेळके यांच्या गावभेट दौऱ्याला भावनिक टच

भाऊबीजेला बहीण भावांच्या भेटीला!

* मविआच्या जयश्रीताई शेळके यांच्या गावभेट दौऱ्याला भावनिक टच
बुलडाणा 
       बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या मविआच्या उमेदवार जयश्रीताई शेळके 3 नोव्हेंबर रोजीच्या गावभेट दौऱ्यात बुलडाणा तालुक्यातील आठ गावांमध्ये जाणार आहेत. आज भाऊबीज असल्याने या भेटीला भावनिक टच असणार आहे. भाऊबीजेला बहीण भावाचे औक्षण करते. भाऊ बहिणीला ओवाळणी टाकतो. यावेळी जयश्रीताई निवडणुकीत उभ्या असल्याने भाऊरायांकडून मतांची भरभरुन ओवाळणी मिळावी, अशी अपेक्षा असणार आहे. 
 
       रविवारी 3 नोव्हेंबर सकाळी 7 वाजता पाडळीत रॅली व सभा, सकाळी 8 वाजता पळसखेड नाईक , 8.30 दत्तपुर, उमाळा सकाळी 9.30 वाजता, देऊळघाट भेट 10 वाजता, अफजलपूरवाडी 11 वाजता, बिरसिंगपूर सकाळी 10.30 वाजता तर दुपारी 12 वाजता जांभरून येथे जयश्रीताई शेळके भेट देणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button