बातमी

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बुलढाण्यात आंबेडकरी समाज एकवटणार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्धार

आता नाही तर कधीच नाही"च्या घोषणेसह २ जून रोजी बुलढाण्यात उपवर्गीकरण विरोधी आंदोलन

*आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात बुलढाण्यात आंबेडकरी समाज एकवटणार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्धार…*

*”आता नाही तर कधीच नाही”च्या घोषणेसह २ जून रोजी बुलढाण्यात उपवर्गीकरण विरोधी आंदोलन…*

अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर एकवटणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपला तीव्र विरोध नोंदविण्यात येणार आहे. “आता नाही तर कधीच नाही” अशी घोषणा देत उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, बुलढाणा यांच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या आवाहनानुसार, अनुसूचित जातींसाठी संविधानाने दिलेले हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आणि आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रस्ताव मागे घेण्याच्या मागणीसाठी हा लढा उभारण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना धक्का पोहोचू नये, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी सहभागी नागरिकांनी डॉ. आंबेडकर नगर, महापुरुषांचे तीन पुतळे, मलकापूर रोड, बुलढाणा येथे एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांचे प्रतिनिधी आणि आंबेडकरी समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. संविधानिक हक्कांचे संरक्षण, सामाजिक समता आणि आरक्षण व्यवस्थेतील विद्यमान रचना कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा सुरू असताना बुलढाण्यातील हे आंदोलन लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनात शांततामय मार्गाने आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button