आंदोलन बातमी

भाजपा व प्रतिगामी सनातनी प्रवृत्तीविरोधात भीमशक्ती संघटनेच्या वतीने  बुलढाण्यात करण्यात आले मुंडन आंदोलन*

भाजपा व प्रतिगामी सनातनी प्रवृत्तीविरोधात भीमशक्ती संघटनेच्या वतीने  बुलढाण्यात करण्यात आले मुंडन आंदोलन*

बुलढाणा, दि. १८ ऑगस्ट २०२६ : उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून मंत्रोच्चाराद्वारे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बुलढाणा येथे मुंडन  आंदोलन करण्यात आले.
माजी मंत्री तथा राज्यसभा खासदार मा. चंद्रकांत हंडोरे  यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात जाणाऱ्या प्रतिगामी व सनातनी प्रवृत्तींचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखदाने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा अधिकार दिला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीमुळे एखादी जागा ‘अपवित्र’ होते आणि त्यानंतर तिचे ‘शुद्धीकरण’ करावे लागते, अशी मानसिकता सामाजिक समता व संविधानिक मूल्यांना छेद देणारी आहे.
या आंदोलनातून सामाजिक समता, संविधानिक मूल्य आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. भविष्यातही समाजात भेदभाव व प्रतिगामी विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात लोकशाही व शांततापूर्ण मार्गाने संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा निर्धार करण्यात आला तर अशा घटना भविष्यात झाल्या तर याचा तीव्र विरोध रस्त्यावर उतरून केला जाईल असा इशारा देखील देण्यात आला
संघ भाजपाचा निषेध. व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यानंतर जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले यावेळी
या आंदोलनात प्रामुख्याने लक्ष्मणदादा घूमरे ऊपा महा प्रदेश काॅग्रेस, भाई प्रदिप अभोरे, सोपाणराव देबाजे, इंजी विजय मोरे, प्रतिक जाधव, विजयकांत गवई, प्रा कविराज पाखरे, भीमराव खरात, सूनिल आराख.अशोक  रवी गवळी, रामचंद्र गायकवाड, वशीम शेख ,मधूकर मिसाळ,भास्कर अंभोरे, सुमीत जाधव,सतिष बोर्डे, रमेश घूमरे  आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने ऊपस्थिती होती.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button