मलकापूर, अशांतभाई वानखडे यांचे वंचित बहुजन आघाडीला जाहीर समर्थन..

मलकापूर, अशांतभाई वानखडे यांचे वंचित बहुजन आघाडीला जाहीर समर्थन.

 

मलकापूर दिनांक 9 मे 2024 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने पुढे आलेला असताना, महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या शक्तीची प्रतारणा करून ,वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी पासून दूर ठेवण्याचा घृणीत प्रयत्न केला. या महाविकास आघाडीच्या अघोरी कृत्यामुळे बहुजन समाज व आंबेडकर जनता महाविकास आघाडीवर रुष्ट झालेली आहे. असे समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखडे यांनी पत्रकार परिषदेत आपला जाहीर पाठिंबा असल्याचे जाहिर केले. ते पुढे म्हणाले की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीला सर्व पर्याय खुले दिले असताना देखील महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी वंचितांचे नेतृत्व पुढे येऊच नये, म्हणून हा मनाचा कोडगेपणा करुन एका निर्णय शक्तीला बाहेर टाकण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. एक प्रकारे आंबेडकरी जनतेने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभे राहण्याचा संकल्प केलेला आहे. महाविकास आघाडीला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. आज रोजी रावेर लोकसभा मतदार संघातील दलित व कष्टकरी शेतकरी कामगार आदी बहुजन घटक व आंबेडकरी जनता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे या उच्चविद्या विभूषित उमेदवाराला जाहीर समर्थन करीत आहोत.“ समतेचे निळे वादळ ʼʼ ही एक सामाजिक संघटना असली ,तरी सक्षम राजकीय पर्याय असलेल्या वंचित बहुजन आघाडी सोबत या संघटनेचे सर्व पदाधिकारी व संघटनेला मानणारे कार्यकर्ते आज सारथी इंटरनॅशनल येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे विनाशर्थे समर्थन करीत आहोत. समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेला मान्य असे सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी संजय ब्राह्मणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, असे आव्हान करीत आहोत.“ समतेचे निळे वादळʼʼ या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ दाभाडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अलकाताई झनके, जिल्हा महिला संघटक सौभाग्यवती उषाताई पवार, समाजभूषण एल.सी. मोरे,विजय तायडे सर ,नांदुरा तालुका अध्यक्ष समाधान वाकोडे, मलकापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, बुलढाणा जिल्हा संघटक अशोक जाधव, दीपक मेश्राम मलकापूर शहर अध्यक्ष ,मोहनभाऊ खराटे, बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भाऊ इंगळे आधी सह नांदुरा मलकापूर तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *