राजकीय बातमी

आझाद समाज पार्टीचे सतीश पवार यांना ठिकठिकाणी मिळतोय प्रतिसाद जन्मभूमी सव येथून प्रचारकार्यास प्रारंभ

आझाद समाज पार्टीचे सतीश पवार यांना ठिकठिकाणी मिळतोय प्रतिसाद
जन्मभूमी सव येथून प्रचारकार्यास प्रारंभ

बुलढाणा
आझाद समाज पार्टीचे उमेदवार सतीश पवार यांच्या प्रचारास जन्मभूमी सव येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ठीक ठिकाणी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आपला हक्काचा माणूस म्हणून सतीश पवार यांना निवडून देत विधानसभेत पाठविण्याचा निर्धार सववासीयांनी पवार यांच्याकडे बोलून दाखविला.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये उच्चशिक्षित उमेदवाराची गरज आहे. त्यासाठी मतदार सतीश पवार यांच्याकडे मोठ्या आस्थेने पाहात आहेत. नेतृत्व, वक्तृत्व, काम करण्याची हतोटी, जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्यासाठी धडपड असा सर्व गुण संपन्न उमेदवार म्हणून सतीश पवार यांच्याकडे पहिल्या जाते. विकासाची गंगोत्री आणावयाची असल्याने सतीश पवार यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज राज्य विधिमंडळात आहे, आम्ही तुम्हाला भरघोस मतांनी निवडून आणू, अशी ग्वाही मतदार त्यांना देत असल्याचे गावागावातील भेटी दरम्यान देत आहेत.
‘ एक, दो, तीन, चार… चुनके लायेंगे सतीश पवार ‘असे नारे नारे देत परिसर दणाणून सोडला तसेच फटाक्यांच्या आतशबाजीतने स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी सहभागी झाले होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button