मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये कार्यकर्ता मेळावा व विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात
मासरूळच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देणार; पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांची ग्वाही, मनोज दांडगे यांच्या कार्याचे कौतुक

मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये कार्यकर्ता मेळावा व विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात
मासरूळच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देणार; पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांची ग्वाही, मनोज दांडगे यांच्या कार्याचे कौतुक

मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा भव्य कार्यकर्ता मेळावा व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. मकरंद आबा पाटील यांच्या उद्घाटनाने आणि प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग तथा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेरजी काझी होते, तर आमदार मनोजभाऊ कायंदे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देत, “मासरूळच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देणार,” असे आश्वासन दिले. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे मासरूळच्या विकासकामांना आगामी काळात आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन तसेच महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
मासरूळ जिल्हा परिषद सर्कलच्या विकासासाठी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या विशेष निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पार पडला. त्यामुळे कार्यकर्ता मेळाव्यासोबतच विकासकामांच्या दृष्टीनेही हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
यावेळी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी आयोजक मनोज ज्ञानदेवराव दांडगे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे विशेष कौतुक केले. मनोज दांडगे यांनी केलेली विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम, जनतेच्या प्रश्नांसाठी केलेली आंदोलने तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याची माहिती देणारी डॉक्युमेंटरी यावेळी पालकमंत्र्यांनी पाहिली.
डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून मनोज दांडगे यांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत “मनोज दांडगे खरोखरच खूप छान काम करत आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
दरम्यान, पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या आगमनावेळी मासरूळमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळकरी मुलींनी औक्षण करून पालकमंत्र्यांचे स्वागत केले, तर तब्बल २५ जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे संपूर्ण मासरूळ परिसर दुमदुमून गेला.
पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली भव्य तयारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमास शंतनु बोंद्रे,इरफान अली,रंगराव बापू देशमुख, प्रसाद जाधव, मनीष बोरकर, निलेश गावंडे, संतोष परीहार, निलेश देठे, निर्मला तायडे, यशवंत धाबे, रामेश्वर पाटील , गजानन सावंत, महेंद्र कड, रियाज मिर्झा, इमरान पठाण, जगन कानडजे, दिलीप सानप, विशाल फदाट, उमेश राठोड, संतोष दांडगे, उमेश दांडगे यांच्यासह बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मनोज ज्ञानदेवराव दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बुलढाणा तथा अध्यक्ष, विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चिखली यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. मासरूळ येथील मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.



