संविधान सभागृह या योजनेची काम सुरू करण्यात यावे यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना आकाश जी फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

संविधान सभागृह या योजनेची काम सुरू करण्यात यावे यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना आकाश जी फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा नामदार आकाश फुंडकर स यांची भेट घेऊन शंकर कंकाळ अकोला महानगर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी निवेदन देऊन
अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू करण्यात यावे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे 500 लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणे याकरिता 2021 मध्ये शासन निर्णय जीआर काढला त्यानुसार सदर गावांच्या लोकसंख्येनुसार याद्या सुद्धा तयार करण्या आल्या परंतु संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू झाले नाही या योजनेमध्ये ग्रामीण अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोचविणे शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासिका सुरू करणे व राज्य व केंद्र शासन शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे यासाठी संविधान सभागृह यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन चरित्र्य विषयीचे प्रेरणादायी भिंती चित्रे असतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका साठी दालन ग्रंथालय मध्ये सर्व समावेशक विषयावर साहित्य ग्रंथ प्रबोधनात्मक साहित्य प्रेरणादायी यशोगाथांचा संग्रहाचा समावेश राहील व ग्रंथालय व अभ्यासिका डिजिटल सुसज्ज राहील तसेच दर्शनी भागात संविधान स्तंभ असावा सदरहू इमारत बांधकामाची बाहेर रचना ही सध्याच्या सामाजिक न्याय भवन इमारतीच्या भरतीवर असावी व इतर सर्व बाबींचे या योजनेमध्ये ठेवण्यात आले आहे ही योजना भावी विद्यार्थ्यांसाठी मोलाची ठरणार व गावाचे वातावरण शिक्षणमय होणार व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल सुद्धा वाढेल व शिक्षणाचा स्तर देखील वाढेल असा विश्वास देखील शंकर कंकाळ यांनी व्यक्त केला महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात सुद्धा ही योजना सुरू झाली त्याचबरोबर आज महाराष्ट्र राज्यातील शहरी वस्त्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अभ्यासिकेची विद्यार्थी करीत आहेत त्यामुळे संविधान सभागृह योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यातील शहरी वस्त्यांमध्ये ही योजना सुरू झाल्यास या योजनेचा शहरी वस्त्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल त्यामुळे लवकरात लवकर संविधान सभागृह या योजनेचे कामे सुरू करण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले
यावेळी पवन कानोजीया रेखाताई घरडे हरिनाम सिंग रोहेल उमेश खंडारे रोहेल बाळू ढोले पाटील श्यामजी मोटवानी आनंद मानकर नितीन जाधव गंगादेवी पुंडगे साधनाताई मोहोळ विलास मोरे अमन घरडे आदिसह सहकारी उपस्थित होते



