शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या तीन दिवसीय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा (कबड्डी) एम.सी.डी.इंग्लीश स्कूल घाटबोरी च्या क्रिडांगणावर संपन्न…

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या तीन दिवसीय तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा (कबड्डी) एम.सी.डी.इंग्लीश स्कूल घाटबोरी च्या क्रिडांगणावर संपन्न…
मेहकर
शिक्षण संचलनालय पुणे व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग बुलडाणा द्वारा आयोजित मेहकर तालुका स्तरीय तीन दिवसीय मुलांच्या व मुलींच्या कबड्डी क्रीडा स्पर्धा मौजे घाटबोरी ता.मेहकर जि.बुलडाणा येथील भव्य क्रिडांगणावर दि.१५ सप्टेंबर रोज मंगळवार ते १७ सप्टेंबर रोज गुरुवार या तीन दिवसात संपन्न झाल्या. या स्पर्धांसाठी मेहकर तालुक्यातून ४२ गावातील विविध शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थीनींचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धांचे उद्घाटन घाटबोरी गावचे सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार, उपसरपंच विजयसिंग चव्हाण,जि.प.शाळा शिक्षण समिती अध्यक्ष आनंदा नवले, ग्रामपंचायत सदस्य आकाश नवले, मेहकर तालुका क्रीडा संयोजक नामदेव जाधव, छत्रपती शाहू कॉलेजचे विश्वस्त संतोष डोंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. या स्पर्धांमध्ये मुलींच्या गटात संजय गांधी विद्यालय घाटबोरी या शाळेने नेत्रदिपक कामगिरी करीत वय वर्ष १४, वय वर्ष १७ व वय वर्ष १९ या तिनही गटात प्रथम क्रमांक प्राप्त करत जिल्हा स्तरावर खेळण्यास जाण्याचा मान पटकाविला. तर मुलांच्या गटात वय वर्ष १४ मध्ये संजय गांधी विद्यालय, वय वर्ष १७ मध्ये विवेकानंद विद्या मंदिर हिवराआश्रम तर वय वर्ष १९ मध्ये छत्रपती शाहू महाराज ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स घाटबोरी या तीन शाळांनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी जाण्याचा मान मिळविला. याशिवाय तालुक्यातील सत्यजित इंटरनॅशनल स्कूल मेहकर, ज्योतीबा फुले देऊळगाव माळी, शिवाजी हायस्कूल मेहकर, जिजामाता कन्या शाळा मेहकर, राजश्री ग्लोबल मेहकर, जगदंबा विद्यालय उकळी, एन.डी.पाटील हिवराखुर्द, शिवाजी हायस्कूल कळंबेश्वर, शिवाजी हायस्कूल डोणगाव, विवेकानंद ज्ञानपिठ हिवरा,बाबुराव पाटील लोणीगवळी, राष्ट्रमाता जिजाऊ जवळा, दादासाहेब चौधरी सोनाटी,सहकार विद्या मंदिर डोणगाव,विठ्ठल रुखमाई विश्वी,मदन पातुरकर डोणगाव, जिजामाता हिवराखुर्द, राजे संभाजी अंत्री देशमुख, सरस्वती जानेफळ, शिवाजी हायस्कूल लव्हाळा, शिवाजी हायस्कूल जानेफळ, भारतीय ज्ञानपिठ मेहकर, विठ्ठल रुखमाई शेलगाव देशमुख इत्यादी शाळांनी त्यांच्या क्रीडा प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धामध्ये जबरदस्त व भारदस्त कामगिरी करत विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा गाजविल्या. या क्रीडा स्पर्धांचे पंच म्हणून कार्य श्री सुभाष शेळके सर, किरण पाटील सर,रवि लोखंडे सर,राजगुरु सर, जाधव सर,देवा राठोड, गोपाल राठोड,अनिकेत वाघमारे,डोळस सर, काळे सर,ठाकरे मामा, डोंगरे सर, पडघान सर, चव्हाण मॅडम,इनकर मॅडम इत्यादी क्रीडा प्रशिक्षकांनी पंच, गुणलेखक व नियोजनाचे जबाबदारी सांभाळली. ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नामदेव जाधव क्रीडा संयोजक मेहकर,कृष्णा धोंगडे सर, संदीप लोखंडे सर, दत्ता मेटांगळे,वैभव मानवतकर,अवचार सर, गोवर्धन राठोड सर, चोंडेकर सर इत्यादींनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण क्रीडा स्पर्धांचे समालोचन इंगळे सर, परसुवाले सर,नामदेव जाधव सर,पवन राठोड इत्यादींनी केले. तर जखमी खेळाडूंसाठी सलग तीन दिवस सेवा आरोग्य विभागाच्या एस.बी.डोके,सौ.उषाताई लठाड,सौ.सुनिता पाखरे, सौ.सुनिता चवरे, सौ.शारदा खोडके इत्यादी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी प्रथमोपचार सेवा पुरविली.
एम.सी.डी.इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थीनींनी सर्व खेळाडू विद्यार्थी व प्रशिक्षकांना औक्षण करुन त्यांचे आदरातिथ्य केले.या क्रीडा स्पर्धांमधून विजेते खेळाडू तालुका स्तरावरुन जिल्हा स्तरावर खेळणार असून,सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना एम.सी.डी.इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.योगिता डोंबळे यांनी शुभेच्छा दिल्या.एकंदरीत घाटबोरी पंचक्रोशीतील विद्यार्थी खेळाडूंसाठी ह्या क्रीडा स्पर्धा म्हणजे गणपती बाप्पाच्या उत्सवावर आनंदाची पर्वणीच ठरल्या असे म्हंटल्यास त्यात काहिही वावगे ठरणार नाही…



