आरोग्य बातमी
गणरायाच्या साक्षीने राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर

गणरायाच्या साक्षीने राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळातर्फे मोफत आरोग्य शिबिर
बुलढाणा
राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या बुलडाणा येथील मुख्यालयी विराजमान श्री गणरायाची सकाळी भक्तिमय वातावरणात आरती संपन्न झाली. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या अध्यक्षतेखाली, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, कारंजा चौक व राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ. मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. केशव पाठक, डॉ. विजय परिहार व सौ. संगीताताई परिहार, पुंडलिक नागपुरे व सौ. यमुनाताई नागपुरे, दिगंबर दळवी यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.
प्रारंभी श्री गणरायाचे पूजन व छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती संपन्न होऊन मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिरात सुमारे २०० नागरिकांनी आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला. यावेळी नागरिकांना आवश्यक आरोग्य तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. ‘सेवा हीच खरी भक्ती’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ. सुनीता बडगे (वैद्यकीय अधिकारी, बुलडाणा), डॉ. राजेश दुतडमल (जिल्हा विस्तार अधिकारी), डॉ. अनंत वायझडे (जिल्हा सुसृषा अधिकारी, बुलडाणा), सतीश बघमरे (जिल्हा माहिती अधिकारी) तसेच राजर्षी शाहू पतसंस्थेचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुभाष बुंधे, सुशील गुळवे, पवन सावळे, प्रीती सावळे, राजाराम तायडे, कृष्णा सावळे, पंडितराव गव्हाळे, संदीप टेकाळे, मंगेश भोंडे, पवन हिवाळे, अमोल सुसर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी तसेच राजर्षी शाहू परिवारातील सदस्य, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



